top of page

आमच्याबद्दल

पिकनिक मॅन हा सहली आयोजित करणारा एक उत्तम पर्याय आहे. आजच्या दगदगीच्या शहरी जीवनात तुम्हाला हवा असतो एक निवांतपणा. घड्याळाच्या काट्याबरोबर धावणाऱ्या लहान थोर सर्वांनाच हवा असतो एक विरंगुळा. वीकेंड असो वा वीकडे, जो असतो, आवडत्या माणसांसोबत घालवलेला अनमोल वेळ ! 
     कुटुंबासोबत  जेवण , मित्रांसोबत धमाल मस्ती, मुलांसोबत खेळ , की आपल्या खास व्यक्तीसोबत रोमँटिक क्षणांचा अनुभव आपल्या साठी खासच असतो. 
       आता बहुतेक मुलांसाठी मामाचा गाव स्वप्नवतच आहे. तरीही रानमेवा. रानभाज्या किंवा बैलगाडीचे आकर्षण आपल्या मनाला खुणावत असतेत. म्हणूनच तुम्हाला या  निखळ आनंदाचा अनुभव देण्यासाठी 'पिकनिक मॅन' एक दोन दिवसांच्या पिकनिक आयोजित करतो. शिवाय रानभाज्या, शेतीमाती तसेच माहेरवाशीन  असे विविध उपक्रम आखणे हे आमचे खास वैशिष्ट्य आहे. रानभाज्या सारख्या उपक्रमातून मराठी मुलखातील  पारंपरिक भाज्यांची पुन्हा ओळख करून दिली जाते. शेतीमाती या उपक्रमातून मुलांना आपल्या मराठी मातीचा स्पर्श लाभतो. ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष जिवंत अनुभव मिळतो. त्या वातावरणातून जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन लाभतो. माय भगिनींना हरवत चाललेला माहेराचा अनुभव देण्यासाठी खास माहेरवाशिन हा उपक्रम आहेच. अशी उत्तम कल्पनेतून साकारलेली आकर्षक पॅकेजेस तुम्हाला अन्यत्र कुठेही मिळणार नाहीत. नवनवीन कल्पनांचा सुखद अनुभव म्हणजेच पिकनिक मॅन. या आनंददायी क्षणांचा, मैत्रीपूर्ण आणि हसतमुख प्रवासाचा साथी.

​आजवर आम्ही हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. नात्यांमध्ये नवचैतन्य फुलवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.
 
   “द पिकनिक मॅन” गेली ७ वर्षे उत्साहाने पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. कल्याण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित, आम्ही सर्वोत्तम टूर आणि ट्रॅव्हल सेवा अत्यंत परवडणाऱ्या दरात देतो. छोट्या पण  उत्तम प्रकारे व्यवस्थापनाद्वारे  अविस्मरणीय वन-डे किंवा वीकेंड पिकनिक ही आमची खासियत.

आमचे व्हिजन

 किफायतशीर पॅकेज, उत्तम नियोजन व अविस्मरणीय आनंदाचे क्षण म्हणजेच पिकनिक मॅन. निव्वळ व्यावसायिक दृष्टीकोन न बाळगता नव्या पिढीला निसर्गाची ओळख करून देणे, पर्यावरणाबद्दल जाणीव निर्माण करणे व आपल्या मराठमोळ्या मातीचा अनुभव देणे हे आमचे व्हिजन. 

आमचे मिशन

लहान थोर सगळ्यांना निखळ आनंद देणे हेच आमचे मिशन. म्हणूनच  आमची  पिकनिक म्हणजे असते आनंदाची पर्वणी. आपल्या खऱ्याखुऱ्या जीवनात तुम्हाला नाही मिळणार किमया करणारा स्पायडरमॅन. पण चिंता नको, आपल्यासाठी सज्ज आहे जादूचा अनुभव देणारा तुमचा आपला पिकनिक मॅन. 
प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यावा अशी अनुभूती. एकदा या मग पुन्हा पुन्हा याल.

आमचा गोल

१५ ऑगस्ट २०२८ पर्यंत १०,००० पेक्षा जास्त लोकांना “द पिकनिक मॅन”च्या माध्यमातून सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव देणे.

© 2035 by 360° TRAVEL INSPIRATIONS.

Powered and secured by Wix

bottom of page